संघटना हजार झाल्या,नेते हजार झाले ,
कुणा म्हणावे आपुले? चेहरे हजार झाले !
तू पाहिलेली स्वप्ने पुर्ण झालीत का रे? बाबा तुझ्या मताची माणसे मेलीत का रे?
राजकानाच्या गटागटात विभागल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीची खंत व्यक्त करतांना वामनदादा कर्डकांनि हा थेट सवाल बाबांनाच कदाचित विचारला असता ! कारण इथला बहुजन समाज या देशातील शासनकर्ती जमात व्हावी म्हणुन बाबासाहेबांनी बहुजन समाजाला सांगितले की, जा बहुजनानो इथली शासनकर्ती जमात तुम्हाला व्ह्यायचं आहे. गौतम बुद्धांनी सांगितलं की,बहुजन हिताय,बहुजन सुखाय म्हणजे आमच हित आणि आमच सुख हा सगळा बहुजन समाज आहे.
स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःच उज्वल भविष्य कधीच घडवू शकत नाही
पण आमचा बहुजन समाज शासनकर्ती जमात व्हायचं तर दूरच उलट आपआपसात भांडण करण्यात व्यस्त आहे.आज आमच्या बहुजन समाजाला आमच्या महापुरुषांचा इतिहासच माहित नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःच उज्वल भविष्य कधीच घडवू शकत नाही.
जगण्याचं आणि जिंकण्याच किती मोठे तत्वज्ञान बाबासाहेबांनी दोन ओळीतच सांगितल पण हे तत्वज्ञान आमच्यापर्यंत पोचहल का? कसं पोचणार ? घटनेच्या या शिल्पकाराला तरी आम्ही कुठे आपलस केलय ? घराची तर सोडाच पण आमच्या बुद्धीची कवाड तरी कुठे आम्ही बाबासाहेबासाठी उघडी ठेवलीत अरे आमच्या मेंदूमध्ये भरलीय नुसती मनुवाद्यांची गटार घाण ? कारण आज इथला ओबीसी समाज बाबासाहेबांना आपला शत्रु समजु लागला .
बाबासाहेबाणी OBC ला पाहिलं कलम दिल
पण इथल्या ओबीसी समाजाला हे सुद्धा माहित नाही.की बाबासाहेबांनी कलम क्र.३४० नुसार सर्वप्रथम ओबिसिला आरक्षण दिले.स्वतःच्या समाजाला कलम क्र.३४२ नुसार आरक्षण माझ्या बाबासाहेबांनी दिल.हे बाबासाहेबांचे उपकार आहे.पण बाबासाहेब आम्हाला समजले कुठे? कारण प्रत्येक लोकांनी फक्त शिवरायाचाच ईतिहास चाळला अण्णाभाऊ साठे,महात्मा फुले,शाहु महाराज,संभाजी राजे या बहुजन महापुरुषांचा इतिहासच आम्हाला माहित नाही आणि आम्ही वाचण्याचा प्रयत्नही करत नाही.
बाबासाहेबाणी OBC आरक्षणासाठी मंत्रिपद सोडलं
ओबीसी साठी कायदेमंत्रीपदाला लाथ मारणारी भारतातील पहिली आणि शेवटची व्यक्ती म्हणजे डॉ.भीमराव रामजी आंबेडकर .पण हा इतिहास आम्हाला कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही.पण आज आमच्याच महापुरुषांचा इतिहास खऱ्या अवस्थेमध्ये नाही
किंवा ते बहुजन समजापर्यंत पोहचू न देण्याच काम काही धर्ममार्थंड नित्यनेमाने व चोखपणे करत असतात. बर इतिहास काय? कोण बाबासाहेब ? कोण शिवराय ?हे तरी माहित हवं ना,ह्यातही नाही ते मनुवाद्याच काम आहे? अरे याच तर गाढवपणामुळे झाला ना संभाजी राजांचा इतिहास कलंकित? झाला ना बाबासाहेबांच्या विचारांचा खुन मग असल्या दगाबाज आणि कपटी जातीच्या हवाली इतिहास कशाला करता ?
अरे ज्या हराम खोराना स्वतःचा इतिहास माहित नाही ते हरामखोर काय तुम्हाला तुमच्या बापाचा इतिहास सांगतील ? बहुजनानो शरीरात सर्वात वर जो डोक नावाचा अवयव दिला आहे नं ,तो केवळ धर्ममार्तंडासमोर बसून इकडून तिकडे हलविण्यासाठी दिला नाही. तर अधून मधुन त्याचा वापरही करावा लागतो .
कसला आलाय डोक्याचा वापर ? सगळा गंज चढलाय गंज . बधीर झालंय आमच डोक धर्माच्या अफुन .मनुवाद्यानी सांगाव आणि बहुजनांनी ती आज्ञा शीरसावान्द्य मानून त्याची हमाली करावी .
बाबासाहेबांनी २ वर्षे ११ महिने १७ दिवसामध्ये अत्यंत पवित्र भारतीय संविधान या जगाला दिले.भारतीय राज्यघटना लिहिताना घटनेमध्ये ३९५ कलमे अंतर्भूत केले.
तर ३९५ वच कलमे का केलीत ? तर राष्ट्रपिता ज्योतीरावजी फुलेंच्या पुणे येथील गंज पेठेतील घरांचा न ३९५ होता आपल्या गुरूला अभिवादन करण्यासाठी अर्थाःत फुलेंच्या घरांच्या चौकटीतून देशाचा राज्यकारभार चालावा त्या करिता ३९५ कलमे अंतर्भूत केले.
ग्रंथाची निर्मिती
बाबासाहेबांनी बहुजनामध्ये जागृती करण्यासाठी “रिडल्स इन हिंदूइझम” या शक्तिशाली ग्रंथाची निर्मिती केली.बाबासाहेबांनी इथला बहुजन समाज हा कर्मकांडाच्या बाहेर पाडवा याकरिता अनेक पुस्तके लिहिली.बाबासाहेबांना माहित होत की क्रांती पुस्तकांनी होते.कारण जिवंत माणसासाठी पुस्तके असतात.
मेलेल्या माणसासाठी फक्त पोथ्या असतात. आमच्या देशात लोकांनी वास्तव्यासाठी अलिशान बंगले बांधले,तर पूर्वीच्या राजे लोकांनी विस्तीर्ण वैशिष्ट्यपूर्ण राजवाडे बांधले तर धनिकांनी काचेचे महाल बांधले.परंतु केवळ ग्रंथाच्या राशी नीटनेटक्या रचुन ठेवण्यासाठी तीन माळ्यांची प्रचंड इमारत बांधल्याचे उदाहरण जगाच्या पाठीवर कुठेही सापडत नाही.ताजमहालासारख्या सुंदर इमारती ,तिरुपतीचे बालाजी मंदिर,शिर्डीचे साई मंदिर , हि सोन्यांनी मढविलेली मंदिरे हि इतिहासाच्या पानापानातून आपणास पहावयास सापडतील.
पुस्तकासाठी घर बांधणारा महापुरुष
पण डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या राजगृहापुढे त्यांचे मुल्य किती ? माणसांनी एकीकडे आपल्या कल्पनेतील देवांची करोडो रुपयांची मंदिरे उभारली.आमच्या देशामध्ये अनेक लोकांनी बायकासाठी घरे बांधली पण बायकांसाठी घर बांधणाऱ्या देशामध्ये पुस्तकासाठी घर बांधणार राजगृह नावाच घर या जगाच्या पाठीवर फक्त एकाच महापुरुषाने बांधल,ज्याचं नाव आहे,डॉ.बाबासाहेब आंबडेकर .
ज्ञानाचे प्रतिक Symbol of Knowledge का म्हणतात
जागतिक पातळीवर कोलंबिया विद्यापीठाने विद्यापिठ सुरु झाल्यापासुन आजपर्यंत ज्ञानाचे प्रतिक (Symbol of Knowledge ) म्हणुन कोलंबिया विद्यापीठान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आणि आजही त्या विद्यापीठात फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा उभारला गेला आहे.
म्हणुन मी माझ्या बहुजन तरुणांना सांगु इच्छितो की,जि माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर गाठतात ,आणि जि माणसे डोक्याने चालतात ती ध्येयापर्यंत पोहचतात.आम्हाला आता नुसत पायांनी चालून चालणार नाही.तर मनुवाद्याच्या छाताडावर पाय देऊन डोक्यान चालायचं आहे.तेव्हाच आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत हे ठासुन सांगता येईल.कारण आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे .
फुले,शाहु,आंबेडकरी विचारानो होताहेत प्रतीगाम्याचे हल्ले,मजबुत करा आमच्या महामानवांच्या विचारांचे किल्ले
आता आमच्या पुरोगामी विचारवताना संपविण्याच काम सुद्धा या देशात चालु आहे.कारण नरेंद्र दाभोळकर , कॉम्रेड गोविंद पानसरे यांचेवर झालेले हे हल्ले आमच्या डोळ्यासमोर आहे जोपर्यंत आम्ही फुले,शाहु,आंबेडकर ,तुकाराम महाराज,यांच्या विचारांना समजुन घेणार नाही तोपर्यंत बहुजन समाज हा अधोगतीच्या वाटचालीकडे दिवसेंदिवस झुकलेला दिसेल.
जगी नाही कोणी मुखीयांचा वाली – तुकाराम महाराज
बाबासाहेबांनी जे मुकनायक नावाच वृत्तपत्र सुरु केल. “ जगी नाही कोणी मुखीयांचा वाली ” हा स्वर सुद्धा बाबासाहेबांनी तुकारामांच्या अभंगातून घेतलेला आहे.
बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्यांच्या आंदोलनाप्रसंगी बाबासाहेबांची घोषणा होती,छत्रपती शिवाजी महाराज की जय.
बाबासाहेबांच्या पी.एच.डी.चा प्रबंध होता. छत्रपती संभाजी राजांची समाजव्यवस्था ,छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी कसा छळ केला हे बाबासाहेबांनी शुद्र पुर्वी कोण होते ? या ग्रंथामध्ये सांगितले कारण हा आमचा इतिहास आहे पण आज २१ व्या शतकामध्ये आजकालच्या मुला-मुलींना जयंतीदिनीच बाबासाहेब व रमाबाई यांची आठवण होते.
इतर दिवसात आमची पोर फक्त कटरिना,सलमानचाच विचार करतात. हि आमच्या बहुजन समाजातील मुला-मुलींची शोकांतिका आहे.
जेव्हा आमचा बहुजन समाज कर्मकांडाच्या कचाट्यातून मुक्त होऊन ज्यावेळेस ते संभाजी महाराज , महात्मा फुले,शाहु महाराज, रमाबाई , अहिल्याबाई , सावित्रीबाई यांचे विचार समजुन घेईल.
तेव्हाच आमचा बहुजन समाज प्रगतीच्या वाटेकडे एक पावुल झुकलेला दिसेल. पण आज आमच्या देशात ती परिस्थिती राहिली नाही.आता आपल्या देशामाध्ये जातीय दंगली खुन,बलात्कार ,जातीयवाद,ई.प्रकरणाचे प्रमाण वाढले आतापर्यंत इथल्या बहुजन समाजाच्या मनावर बिंबवल्या गेले की, बाबासाहेब फक्त बौधाचे ,अण्णाभाऊ साठे फक्त मातंगाचे ,महात्मा फुले फक्त माळ्यांचे ,शिवाजी महाराज फक्त मराठयांचे ,हा खोटे पणाचा इतिहास आमच्या तरुणांच्या कोवळ्या मनावर भिनला गेला कारण त्यांनी खरा इतिहास काय आहे याचे कधीच पाने चाळून बघितली नाही .
आज २१ व्या शतकामध्ये जर बाबासाहेबांनी जाती धर्माच्या दंगली पहिल्या असत्या तर माझे बाबासाहेब सुद्धा म्हटले असते ,
कशासाठी ,जगलो,लढलो कविता
कशासाठी ,जगलो,लढलो
कशासाठी वेचले प्राण,
कुठे गेली मी दिलेली घटना
अन कुठे रुजले मी दिलेले भान
माझे लोक माझी जनता ,
कुठे होती कुठे आहे
जाती धर्माच्या संघर्षात
भारतीय कुठे आहे ?
म्हणून आज आम्हाला आमच्या तरुणांना आमच्या महापुरुषांचा इतिहास समजुन घ्यावा लागेल.पण हल्ली २१ व्या शतकामध्ये तरुण मित्र-मैत्रिणींना इतिहास तर माहित नाही.
पण कोणत्या महिन्यात कोणत्या अभिनेत्रीचा चित्रपट निघाला हे नक्की माहित असते.जर तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर आमचे स्फूर्तीस्थान बाबासाहेब,अण्णाभाऊ साठे,बिरसा मुंडा ,सावित्रीबाई फुले,झलकारीराणी, माता रमाई ,अहिल्याबाई ,जिजाऊ ,इ.असले पाहिजे .कारण ,इतिहासपासुन जर आम्ही बोध घेतला नाही तर इतिहास आपल्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
काही मनुवादी विचारांनी पोखरून निघालेले सांगतात की,आमचे नेते,मार्गदर्शक हेच आमचे स्फूर्तीस्थान आहे.पण एक सांगतो,आमची प्रेरणा ,स्फुर्ती ,शक्ती हे नेते मार्गदर्शक नसुन आमचे गौतम बुद्ध ,संभाजी राजे,गाडगे महाराज ,इ.हे खरे स्फूर्तीस्थान आहे. बहुजनानो अजुन वेळ गेलेली नाही,आतातरी जागे व्हा ,आता प्रत्येकाने आपआपल्या घराघरातुन खोटा इतिहास काढुन आमच्या बहुजन महापुरुषांचा खरा इतिहास वाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीदिनी वंदन करा आणि आजपासुन कामाला लागा.
सरतेशेवटी एकच सांगतो,
आग पेटवा तरुणांनो शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांची,
नाहीतर गरज काय या शिक्षणाची
जगणे आता कठीण झाले,
इतरांच्या भांडणात फक्त मराठा बहुजनच मेले………..!
बहुजन समाजातील तळागाळातील बुद्धिमान युवक-युवतीनो गंजुन मरण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांसाठी झिजून मारा…
जय जिजाऊ ! जय शिवराय.!
मोहीत गावंडे ( संभाजी ब्रिगेड )
मो.९६०४४९५९७७