भारताचा राष्ट्ध्वज तिरंगी असून त्यात वरील भाग केशरी,मध्यभागी पांढरा आणि त्याखाली गडद हिरवा अशा तीन रंगातील समप्रमाणात आडव्या पट्ट्या आहेत.मध्यभागातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यावर गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.त्याला २४ आरे असून,२२ जुलै १९४७ ला हा राष्ट्ध्वज घटना समितीने समंत केला.
तीन रंग काय संदेश देतात
तेव्हा पासून आपन १५ ऑगस्ट दिनी भारतभर हा तिरंगा फडकवून स्वातंत्र दिन साजरा करून मोकडे होतो.परंतु हा तीन रंगाने बनलेला तिरंगा आपणाला कोणता संदेश देण्यासाठी फडफडत असतो.याची जान आपणाला असणे आवश्यक आहे.
१)केशरी रंग
ज्याप्रमाणे केशरी रंग हे त्यागाचे प्रतिक आहे.त्याच प्रमाणे ते शरीरिक स्वातंत्र प्राप्त करण्याचे संदेशक सुध्दा आहे.भारत मातेच्या वीर जवानांनी प्राणाची आहुती देऊन भारत मातेला पारतंत्र्यातुन मुक्त केले.त्याच प्रमाणे,प्रतेक नागरिकामध्ये देशासाठी प्राणपणाला लावण्याची जिद्द,वेळ प्रसंगी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी ठेवली पाहिजे.तेव्हाच आपन शारीरिक दुष्ट्या स्वतंत्र झालो असे म्हणता येईल.
२)पांढरा रंग
ज्याप्रमाणे पांढरा रंग समानतेचे प्रतिक आहे.तथा मानसिक स्वातंत्र्याचे संदेश देणारे सुध्दा आहे.येथे कोणी लहान अथवा मोठा नसून सर्व मानव,पशु,पक्षी समान आहेत.त्याच प्रमाणे आपणही आपसी भेदभाव न बाळगता जाती भेद विसरून,मनपूर्वक समतेची आणि समानतेची वागणूक देणार नाही.तो पर्यंत आपन मानसिक स्वतंत्र झालोत असे म्हणताच येणार नाही.
३)हिरवा रंग
आणि हिरवा रंग हरित क्रांतीचे प्रतिक आहे.भारत देश हा कृषी प्रधान देश आहे.आपन शेतकऱ्यांची मुले आहोत,त्यामुळे कामधंदा करण्यास संकोच न बाळगता,हाताला मिळेल ते काम करण्यास समाधान मानुन आकर्षक व चमचमीत विदेशी वस्तुला बळी न पडता स्वदेशी वस्तुचा वापर करून आर्थिक बाजु बळकट करायला हातभार लावला पाहिजे तरच आपन आर्थिकदुष्ट्या स्वतंत्र बनु.
तिरंग्या वरील अशोकचक्र
तिरंग्या वरील अशोकचक्र हे सारनाथ येथील सिंह-स्तभावरील,जगाच्या इतिहासातील भारताच्या प्राचीन सभ्यतेचे चिन्ह असुन शांतम,शिवम्,सुंदरम् च्या सनातन सत्यावर फिरत आहे.आणि हेच सत्य संसाराला स्थीर ठेवत आहे.
अशोकचक्र हे गती,प्रगती,आणि उन्नतीचे प्रतिक असुन धम्माआचरणाचे ही प्रतिक आहे.अशोक राजाने बुद्धाच्या शांततेच्या नी समतेच्या संदेशाला शरण जाऊन स्वताची परीव्रजा केली आणि मुलगा महेंद्र तथा मुलगी संघमित्रा या दोन्ही मुलांना धम्मकार्या करीता दान दिली.म्हणजेच धम्मचक्राला गती दिली.
तेव्हा पासुन धम्मचक्र हे अशोकचक्र नावाने प्रचलीत झाले.प्रतेकाशी धम्मनीतीने,सदभावनेने,सत्यतेने,सद्नशील मार्गाचा अवलंब करून आपन धम्मचक्राला गती प्रदान करू शकतो.
उपदेश
भारतदेश स्वातंत्र होऊन आज ६७ वर्षे पुर्ण झालीत तरी आजही आपन शरीरिक,मानसिक आणि आर्थिक दुष्ट्या पारतंत्रातच वावरत आहोत.जोपर्यंत आपन शरीरिक,मानसिक आणि आर्थिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही.तो पर्यंत आपल्याला तिरंग्याला सलामी देण्याचा काही एक अधिकार नाही.आजही आपन येणेकेने प्रकारे पारतंत्रातच वावरत आहोत.जेव्हा आपन ह्या गुलामगिरीतून मुक्त व्हाल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपन स्वातंत्र झालोत हे सिद्ध होईल.आणि तेव्हा मात्र भारत देश हा संपर्ण विश्वात नंबरवन बनल्या शिवाय राहाणार नाही !
संपादकीय लेख खुप खुप आवडला, असेच लेख वांरवार वाचायला मिळावेत हीच विचारवृत्त कडून सामान्य माणसाची अपेक्षा आहे.
आपल्याला संपादकीय लेख आवडला आणि आपण आपले विचार,’विचार वृत्त’ ला कळविल्याबद्दल शतश: धन्यवाद. आपल्या अपेक्षाची सदैव पूर्तता करण्यास आम्ही कटीबद्द आहोत परंतु आपल्या मदतीशिवाय शक्य नाही करीता आपणही सहकार्य करावे हीच अपेक्षा….