Headlines

डोळ्यांची ताप साथ सर्वीकडे पसरतेय – मुंबई पुणे नागपूर , काय करणार उपाय जाणून घ्या : Conjunctivitis, pink eye infection , Eye Flu, know more in marathi

Conjunctivitis, pink eye infection , Eye Flu,

सध्या मोठ्या प्रमाणात पसरणार डोळ्याचा आजार आला आहे. यालाच आपण डोळे आले असे मराठी मध्ये म्हणतो यावर असा अजून पर्यंत ठोस निदान डॉक्टरांकडून सांगितलेले नाही त्यामुळे जनतेमध्ये घबराहाठ पसरली आहे. या आजाराचं नाव आहे ‘व्हॉयरल कॉन्जंक्टाइवाइटिस’ किंवा सामान्यपणे ‘पिंक आई’ लाल डोळे, किंवा डोळे येणे म्हणतात.

आज आपण जाणून घेणार आहे या पसरणाऱ्या रोगाबद्दल त्याचे उपचाराचे पर्याये, आणि आपण आपली व आपल्या परिवाराची कशी काळजी घ्यायची ते सुद्धा.

लक्षणे काय आहे

व्हॉयरल कॉन्जंक्टाइवाइटिसचं लक्षणं:

  • एका किंवा दोन्ही डोळे लाल झाल्यासारखे दिसणे
  • डोळ्यामध्ये सतत पाणी येणे
  • डोळ्यांत खाजवल्या सारखे वाटणे , जळजळ होणे
  • प्रकाशाचा डोळ्याला त्रास होणे
  • डोळ्‍यांतून पांढरं पाणी वाहने

या प्रकारचे लक्षण आपल्याला दिसु शकतात असे असल्यास घाबरू नका काही उपाय आपल्याला करायचे आहे ते खालील प्रमाणे

उपाय काय करणार

  • आपले हात सर्वात महत्वाचे आहे त्यामुळे ते सतत डोळ्याला लावू नका त्यामुळे डोळ्यांना बाहेरील संसर्ग वाढतो
  • आपले हात स्वच्छ धुवा सॅनिटायझर वापरू शकता
  • एकमेकांचे टॉवेल किंवा रुमाल शकतो वापराने टाळा आपण इतरांना वापरायला देऊ नका
  • आपल्या डोळ्यां मधील आलेले पाणी पुसण्यासाठी इतर कोणतंही कापड वापरू नका
  • आपल्या डोळ्यां मधील आलेले पाणी पुसण्यासाठी बोटाने सुद्धा त्याला चोळू नका

डोळ्यांचा आजार झाल्यावर डोळे पुसण्यासाठी ली पद्धत करा

डोळे हे शरीरातील खूप संवेदनशील अवयव आहे त्यामुळे त्याची काळजी खूप सावधानतेने घेणे गरजेचे आहे.

तुम्हाला डोळ्याचा संसर्ग झाला असेल तर

१. एक रुमाल घ्या तू कॉटन चा असायला हवा

२. एक चमचा हळद घेऊन ती एक ग्लास पाण्यामध्ये टाका

३. नंतर ती रुमाल त्यामध्ये बुडवा १ मिनटं नंतर त्याला सुखवा

४. पूर्ण पाने सुखल्यानंतर त्या रुमालाने तुम्ही टॉमच्या डोळ्यात आलेले पाणी साफ करा

याने तुमचे संसर्ग आणि तेथील जंतू जास्त पसरणार नाही हळदीने तयार केलेला हा रुमाल तुम्हाला मदत करू शकतो.

हा रोग कसा पसरतो

मुख्यतः कंजंक्टिवायटिस हा संसर्ग वातावरणामध्ये बदल झाल्याने सूक्ष्म जिवाणूंमुळे पसरतो हे जिवाणू पावसाच्या दिवसात तयार होतात.

हा आजार आपल्या डोळ्यांमधून निघणाऱ्या स्त्राव / पाणी या माध्यमातून पसरतो आपण जळजळ झाली कि डोळ्याला हात लावतो आणि मग आपला हात आपल्या कपड्याने व इतरांना स्पर्श करतो त्यामुळे हा विषाणू पसरत आहे.

मुंबई पुणे नागपूर सारख्या गर्दी च्या ठिकाणी याची लागण खूप जोरात वाढत आहे.

डोळ्यांचा फ्लू किती दिवसात बरा होईल?

साधारणतः हा डोळ्याचा आजार स्वतःहूनच शरीर त्याला बारा करतो या आजार पासून बार होण्यासाठी होण्यासाठी ६ ते १२ दिवस लागू शकतात.

जरी हा आजार स्वतःहून चांगला होत असला तरी या कालावधीत रुग्णाला डोळ्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे काळजी घेणे घरजेचे आहे.

आणि काही भागात असा पण समाज लोकांमध्ये असल्याचे दिसत आहे कि एकदा झाला कि परत होत नाही, डॉक्टरांनी असा समज चुकीचा आहे सांगितले आहे.

त्यामुळे एकदा झाला कि परत सुद्धा जा आजार होऊ शकतो त्यामुळे चांगल्या प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.

लहान मुलांसाठी काळजी आवश्यक

लहान मुलं मध्ये शाळेमधून हा रोग जोरात पसरत आहे. त्यामुळे मुलांकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *